आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Use Of Traditional Seeds, Fertilizers, Eknath Khadse

ज्यांच्या बापजाद्यांनी शेती केली नाही त्यांनी शिकवू नये, खडसेंचे खडे बोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मलमूत्रामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात ३० ते ३५ टक्के वाढ करणे सहज शक्य होईल. या विचाराने सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यावर अज्ञानी लोक टीका करत आहेत. ज्यांच्या बापजाद्यांनी कधी शेती केली नाही, ते आम्हाला काय शिकवणार, अशा शब्दांत कृषी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांचा खरपूस समाचार घेतला. खरीप आढावा बैठकीत बोलताना त्यांनी, नवीन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मूत्र फायद्याचे असल्याचे सांगितले होते. राहुरी कृषी विद्यापीठ यावर संशोधन करत आहे. मलमूत्राचे फायदे लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतीच्या विकासाकरिता मलमूत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यावर गडकरी खडसे नवीन थेरी आणत असल्याची टीका प्रसारमाध्यमे करत आहेत. ज्यांच्या बापजाद्यांनी कधी शेती केली नाही, त्यांना मलमूत्र सेंद्रिय शेती कळणार नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये,असा इशारा खडसेंनी दिला. युती सरकारने शेती शेतकऱ्यांचा शाश्वत विकास करण्याचे धोरण आखले असून शेतीसाठी पारंपरिक स्रोतांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्लॅन आखले जात आहे. मलमूत्र, पारंपरिक बी बियाणे, सेंद्रिय खतांवर भर देऊन फायदेशीर शेती करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय-काय म्हणाले खडसे...