आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ustad Zakir HussainProgram On 15 December At Aurangabad

उस्ताद झाकीर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा यांची 15 डिसेंबरला जुगलबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन आणि संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या जुगलबंदीचा अनुभव शहरवासीयांना घेता येईल, अशी माहिती ‘प्रोझोन’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अनिल इरावणे आणि व्हायोलिन अकादमीचे संचालक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी दिली. एंड्युरन्स ग्रुपने प्रायोजित केलेला हा कार्यक्रम 15 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता प्रोझोनच्या लॉनवर होईल. ‘द लिजेंड’ हा महोत्सव सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकीट विक्री प्रोझोन मॉल इन्र्फमेशन डेस्क, जॉइंट कॅफे कॅनॉट प्लेस, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, संत एकनाथ रंगमंदिर, तापडिया नाट्यगृह येथे 7 डिसेंबरपासून होईल.