आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तमसिंह पवार निवडणूक लढणाऱ, प्रचाराला अंतुले येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्ते जो आदेश देतील, त्यानुसार मी चालेल, असे सांगणारे उत्तमसिंह पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी लढण्याचा आदेश दिल्याने ते निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय पक्का झाला आहे. पवार गुरुवारी (3 एप्रिल) अर्ज भरणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवार यांच्या प्रचारकार्यात माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच पवार यांनी बंड पुकारले. परंतु दोन दिवसांची प्रतीक्षा करा, अशी सूचना र्शेष्ठींनी केल्यामुळे त्यांनी तलवार म्यान केली होती. त्या दोन दिवसांत पक्षाकडून त्यांना विधान परिषदेवरील आमदारकीची ऑफर देण्यात आली. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात तयारी केल्यामुळे त्यांनी मागच्या दाराने सभागृहात जाण्याची ऑफर आणि संधीही नाकारली. द्यायचेच असेल तर तिकीट द्या, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांनीच त्यांना लढण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पवार मैदानात उडी घेणार हे जवळपास नक्की झाले आहे.
उत्तमसिंह पवार यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांची साथ मिळणार असून, पवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार असल्याचे पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.