आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मैदानात, उत्तमसिंह पवार यांची स्पष्टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भूमिपुत्रांना रोजगार तसेच गुंठेवारीतील लोकांना नागरी सुविधांसह जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उत्तमसिंह पवार यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न राजेंद्र दर्डा यांनी चालवला असल्याची टीकाही त्यांनी केली.

पवार यांनी बुधवारी "दिव्य मराठी' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी विविध मुद्द्यांवर मते मांडली. लोकसभेत माघार घेण्यामागची कोणती कारणे होती, हे स्पष्ट करताना केलेल्या सामाजिक विकासाच्या कामांची माहिती दिली. बाबासाहेब भोसले हे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. पृथ्वीराज चव्हाण त्यापलीकडे गेले आहेत. त्यांच्या कारभारामुळे राज्याचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. पूर्वमध्ये शिवसेना आणि दर्डांमध्ये छुपी युती झाल्याचा आरोप त्यांनी केला. माझी लढत भाजपचे अतुल सावे आणि दर्डांशी होणार असून माझा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
आश्वासन पाळलेच नाही
त्रलोकसभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेवर नियुक्तीचा शब्द दिला. तो त्यांनी पाळला नाही.
त्रमी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तेव्हा काँग्रेसने मुद्दाम कुमकुवत उमेदवार दिला आहे. तो पडणारच आहे. त्याला पडण्यासाठी आपले निमित्त कशाला, असा विचार मांडला. त्याच वेळी मी विधानसभेत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला होता.
मुस्लिमांची अवस्था बिकट
त्रदर्डा स्वत:ला मुस्लिमांचा प्रतिनिधी मानतात, पण त्यांची अवस्था दारिद्र्यरेषेच्याही खाली आहे. शहरातील सामाजिक एकोप्याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे ते एमआयएमकडे झुकणार नाहीत. विमानतळ, कर्करोग रुग्णालय, विभागीय क्रीडा संकुल विलासराव देशमुख यांच्यामुळेच आले.