आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तमसिंह पवार असू शकतात राष्ट्रवादीचे उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असला तरी ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतील, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली नाही तर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. शिवसेना-भाजपची युती झाली नाही तर मित्रपक्षाकडील जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची याची पडताळणी भाजप आणि शिवसेनेकडूनही केली जात आहे. अशीच तयारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडूनही सुरू असून तूल्यबळ उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांकडून संभाव्य उमेदवारांना थेट संपर्क केला जात आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून िनवडणूक लढवू इच्छिणारे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनाही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. या आधी गजानन जानकर यांच्या रासपकडून ते उमेदवार असतील असे सांगण्यात येत होते. मात्र, भाजप पूर्व मतदारसंघ रासपसाठी सोडण्याची शक्यता कमी असल्याने पवार यांनी त्या पक्षाकडे जाणे टाळले आहे, असेही त्यांचे समर्थक सांगतात.
आताच सांगता येत नाही
मी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी करणार आहे आणि त्यासाठी २६ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी असेल हे आताच सांगता येत नाही. राजकारणात वेगवेगळे प्रस्ताव येतच असतात. त्या संदर्भात जाहीरपणे बोलणे योग्य नसते.
उत्तमसिंह पवार, माजी खासदार