आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttamsingh Pawar News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy

मला विधान परिषदेची आमदारकी नकोच, लोकसभा उमेदवारीच द्या,पवार निर्णयावर ठाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुढील महिन्यात विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त होत असून त्यातील एका जागेवर संधी देण्याचे पक्षाकडून उत्तमसिंह पवार यांना सांगण्यात आले असले तरी विधान परिषदेची आमदारकी नको. लोकसभा उमेदवारीबाबत निर्णय घ्या, असे पवार यांनी र्शेष्ठींना सांगितले. सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. मात्र, पवार यांनी निर्णय बदलला नसल्याचे स्पष्ट केले.


औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने पवार यांनी बंडाचा इशारा दिला होता. मात्र, र्शेष्ठींनी पुनर्विचाराचे संकेत दिल्याने दोन दिवस प्रतीक्षा करीत असल्याचे पवार यांनी मंगळवारी सांगितले होते. त्यानंतर सकाळी मुख्यमंत्री चव्हाण पवार यांच्याशी बोलल्याचे समजते. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पाच वर्षांपासून मी निवडणुकीची तयारी केली होती. तेव्हा मागच्या दाराने विधान परिषदेत का जाऊ? असे पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


काँग्रेसकडून लढलो नाही तर सेना जिंकेल!
लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून मी लढलो नाही तर पुन्हा शिवसेनेचा विजय होईल. त्यामुळे येथून शिवसेनेला नेस्तनाबूत करायचे असेल तर माझे लढणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता पक्षानेच घ्यावा, असे पवार यांनी स्पष्ट केले.