आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttamsingh Pawar News In Marathi, Congress, Aurangabad Lok Sabha Seat

उत्तमसिंह पवारांची तलवार 2 दिवसांसाठी म्यान,उमेदवारी मिळणार असल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून नितीन पाटील यांना सोमवारी उमेदवारी जाहीर होताच बंडाची डरकाळी फोडणारे उत्तमसिंह पवार यांनी मंगळवारी आपली तलवार दोन दिवसांसाठी म्यान केली. श्रेष्ठींनी प्रतीक्षा करण्याची सूचना केल्याने आपण दोन दिवसांनी निर्णय घेऊ, असे सांगतानाच उमेदवारी बदलून मलाच मिळेल, असा दावाही केला. आपण अद्याप पक्ष सोडलेला नाही, उमेदवारी मिळाली नाही तर कार्यकर्ते ठरवतील तसे होईल, असेही ते म्हणाले.


राजेंद्र दर्डा यांनीच पवार यांचे तिकीट कापले, असा कार्यकर्त्यांचा व स्वत: पवार यांचा सूर होता. त्यामुळे दर्डा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. सिडको बसस्थानकासमोरील गणेश मंगल कार्यालयात सकाळी पवार यांच्या सर्मथकांची बैठक झाली. आज, उद्या मुंबई-दिल्लीचे नेते शहरात येऊन उमेदवारीचा पुनर्विचार करणार आहेत, त्यानंतर निर्णय घेऊ, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. सदाशिव गायके, डॉ. नामदेव गाडेकर, जी. एस. ए. अन्सारी, बबन डिडोरे, राजेंद्र दाते पाटील, फिरोज खान, शोएब खुस्रो उपस्थित होते.