आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttamsingh Pawar News In Marathi, Congress, Aurangabad Lok Sabha Seat

काँग्रेसच्या नेत्यांचे सेनेसोबत साटेलोटे - उत्तमसिंह पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादमधील शिवसेनेची सत्ता केव्हाही उलथवली जाऊ शकते, पण इच्छा आहे कोणाची, काँग्रेसच्याच नेत्यांचे शिवसेनेसोबत साटेलोटे आहे, असा आरोप उत्तमसिंह पवार यांनी केला. श्रेष्ठींच्या सूचनेनंतर दोन दिवस प्रतीक्षा करून पुढील निर्णय घेणार असल्याचेही या वेळी त्यांनी जाहीर केले.


गणेश मंगल कार्यालयात पवार यांच्या सर्मथकांची बैठक झाली. या वेळी त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर सडेतोड टीका केली. गेल्या निवडणुकीत नितीन पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याची कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष दिली. गद्दारीची कबुली देणार्‍याला तिकीट कसे मिळू शकते, असा सवाल करतानाच पाटील हे गुन्हेगार व गद्दार असल्याचा आरोप पवार यांनी केला. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु ऐनवेळी ती बदलून सुभाष झांबड यांना दिली. माझ्याबाबतही तसेच होईल, असा दावा त्यांनी केला. पक्षाने जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा, असेही ते म्हणाले.


मी अण्णा हजारेइतका स्वच्छ
मी अण्णा हजारेइतका प्रामाणिक अन् स्वच्छ आहे. अण्णा तर राजकारणात नाहीत, मी राजकारणात असूनही स्वच्छ आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षाही मी अधिक स्वच्छ असल्याचा दावा त्यांनी आधी केला. गायके यांनी थांबवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनंतर मीच प्रामाणिक अशी सुधारणा त्यांनी केली. राजकारणातील अरविंद केजरीवाल अन् राजू शेट्टीही मीच असल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला.


व्यापारी म्हणून आले, फक्त व्यापार करा : येथील काही नेते शहरात व्यापार करण्यासाठी आले आहेत. त्यांनी फक्त व्यापार करावा, आम्हाला शहाणपण शिकवू नये, अन्यथा आम्ही माफ करणार नाही, असे राजेंद्र दाते यांनी सांगितले.