आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलयाला झाली दोन वर्षे पूर्ण, आठवणी मात्र ताज्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उत्तरांचलमध्ये २०१३ मध्ये आलेल्या महाप्रलयात बेपत्ता झालेले सुरेश दाभाडकर, जयकुमार दाभाडकर आणि श्यामकुमार पाठक.)
औरंगाबाद- उत्तराखंडात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. १६ जून २०१३ ला आलेल्या महापुरात हजारो भाविक वाहून गेले, ते आजही बेपत्ता आहेत. ते परत येतील अशी आशा त्यांच्या नातेवाइकांना आजही आहे.
१६ जून २०१३ ला केदारनाथ, गौरीकुंड, बद्रीनाथ येथे मोठी जीवितहानी झाली होती. हजारो भाविक पाण्याच्या लाटेत वाहून गेले ते परत कधीही परतण्यासाठी. अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरवले, तर अनेक जण अनाथ झाले. काहींच्या आयुष्यात कायमचाच अंधार झाला. ही भयावह स्थिती शहरातील काही नागरिकांनी प्रत्यक्ष किंवा त्यांच्या जवळच्या माणसाला गमावून अनुभवली आणि ही मंडळी परत तिकडे जाण्याचा सल्लादेखील द्यायला विसरत नाहीत.
अाविष्कार कॉलनीतील रहिवासी वैभव दाभाडकरांचे वडील, काका-काकू असे पाच जण या महाप्रलयात गायब झाले. जयकुमार दाभाडकर, सुरेश दाभाडकर, श्यामसुंदर पाठक, विजय दाभाडकर आणि विद्या दाभाडकर अशी त्यांची नावे आहेत. वैभव हा घरातील जयकुमार दाभाडकरांचा एकुलता एक मुलगा. आज त्याच्यावर घरातील सगळी जबाबदारी पडली आहे. जून २०१३ रोजी औरंगाबादहून अंबिका ट्रॅव्हल्सतर्फे हे सगळे उत्तराखंडात गेले होते. आजही चमत्कार व्हावा आणि ते परत यावेत, अशी भावना दाभाडकर कुटुंबीयांची आहे.
निराशा
या प्रलयानंतर औरंगाबादहून दाभाडकरांचे काही नातेवाईक त्यांना हुडकण्यासाठी हरिद्वार, गौरीकुंड येथे गेले होते, मात्र ते थांबलेले हॉटेल, गौरीकुंडच पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याचे पाहून ते परत आले.
प्रतिक्रिया...
या नैसर्गिक आपत्तीनंतर दाभाडकर कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी प्रचंड दु:ख व्यक्त करून ज्यांना अशा ठिकाणी जायचे आहे, त्यांनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यावर जावे, लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नये. कारण ३० दिवसांत परत येऊ, असे म्हणून जाणारी आमची माणसे परत आल्याने त्याचा किती त्रास होतो, याची कल्पना करणेही ख्ूप त्रासदायक आहे.

त्यांचा तो शेवटचाच फोन ठरला
१३ जून २०१३ रोजी त्यांचा घरी फोन आला की, हृषीकेशवरून गौरीकुंडावर चाललो आहे. हा त्यांचा शेवटचा फोन होता. तेव्हापासून आजपर्यंत दाभाडकर परिवार या सगळ्यांची वाट पाहत आहे; पण ते परत येण्याची आशा आता हळूहळू मावळत चालल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शहरातील अंदाजे ३०० भाविक उत्तराखंडात जाणार असल्याची माहिती आहे. २०१३ च्या प्रलयानंतर या ठिकाणी जायचे असल्याने त्याची नोंद जिल्हा प्रशासनाला करण्याचे आवाहन शासनाने केले होते; पण त्याची दखल अजूनही नागरिकांनी आणि ट्रॅव्हल्स एजन्सीने घेतली नाही. ट्रॅव्हल्स एजन्सीकडून प्रवाशांना बुकिंग करताना आधार कार्डची झेरॉक्स द्या, प्रवासात मोजकेच सामान सोबत घ्या, परत अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे काय करू नये याबाबत माहिती देण्यात येत आहे. शहरातील काही ट्रॅव्हल्स एजन्सीजशी बातचीत केली असता, कितीही खबरदारी घ्या किंवा घेऊ नका, अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना आपण करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...