आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरच्या ३९० शाळांच्या पोषण आहाराची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर -शालेय विद्यार्थ्यांना शाळास्तरावर दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील ३९० शाळांमधील पोषण आहार नमुन्यांची तपासणी स्थानिक शिक्षण विभागाकडून केली.
पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. हा आहार तयार करण्यासाठी शाळा गुणवतायुक्त साहित्याचा वापर करते का, याची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांतील शालेय पोषण आहाराचे नमुने संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथील तालुकास्तरावर शाळांमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीचा अहवाल केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार आहे.
शालेय पोषण आहाराची गुणवत्ता आणि वितरणाबाबत राज्यभरात दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवारी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शाळांमधील पोषण आहाराची तपासणी केली. तपासणी करून त्यातील १०० ग्रॅम तांदूळ, तेल, डाळी, किराणा साहित्यातील वस्तूंसह कडधान्याचे नमुने पंचनामा करून सीलबंद करण्यात आले.

शंभर टक्के तपासणी
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, हायस्कूल तसेच नगर परिषद अनुदानित खासगी शाळांत शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचे नमुने तपासणीचे काम शंभर टक्के करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांनी सांगितले. या शाळांमधील पोषण आहाराचे नमुने सीलबंद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.