आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अपघात 24 जखमी; कन्नडला अ‍ॅपेचे टायर फुटले, वैजापुरात बसला कंटनेर धडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड येथे बुधवार, 30 रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणार्‍या अ‍ॅपेरिक्षाचे (एमएच 20 टी 4323) टायर फुटून 16 जण जखमी झाले. जखमींमध्ये 13 महिला व एका बालकाचा सामावेश आहे. जखमींमध्ये अजिंक्य जाधव, ज्योती थोरात, रेखा शेवाळे, अरमान मस्तान खान, अनिता टोकरे, ललिता गुडेकर, ज्योती जाधव, मंगल नरवडे, उत्तम कोळी, बाजाबाई कोळी सर्व रा. नरसिंगपूर, ज्योती त्रिभुवन, शकुंतला त्रिभुवन रा. मोमिनपुरा, आशा काकडे, अलका बोर्डे, निर्मला सातदिवे सर्व रा. म्हाडा कॉलनी, कमल देहाडे रा. दत्त कॉलनी आदींचा समावेश आहे. जखमींवर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

वैजापुरात बसमधील 18 प्रवासी बचावले
वैजापूर - भरधाव कंटेनरने बसला धडक दिल्याने आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील गंगापूर चौफुलीवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील 18 प्रवासी सुदैवाने बचावले; परंतु बस व कंटेनरचे मोठे नुकसान झाले. गंगापूर आगाराची बस वैजापूरहून गंगापूरकडे जात होती. त्याच वेळी मुंबईकडे लोखंडी गज घेऊन जाणार्‍या कंटेनरने बसला जोरात धडक दिली. यात आठ प्रवासी जखमी झाले. जखमींवर वैजापूर येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

छायाचित्र : कन्नड येथील कारखाना परिसरात अपघातानंतर अ‍ॅपेचा चुराडा झाला होता.