आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वैजापूर येथे महाराष्ट्र बँकेला आग; कागदपत्रे खाक, 26 लाखांचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर शहरातील  डेपो रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. - Divya Marathi
वैजापूर शहरातील डेपो रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले.
वैजापूर   - शहरातील डेपो रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शुक्रवारी सकाळी सात वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीमध्ये बँकेतील फर्निचर, संगणक, दस्तऐवज भस्मसात झाले.  प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवला असून २६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  
 
शुक्रवारी सकाळी बँक बंद असताना अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर  अग्निशमन दलाचा एक बंब आणि एक खासगी टँकर घटनास्थळी दाखल झाले.  दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सकाळच्या वेळेत आग लागल्यामुळे इमारतीमध्ये कोणीही नव्हते. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट तयार झाले होते.  
 
रोकड सुरक्षित...
बँकेला लागलेल्या आगीत दर्शनी भागातील फर्निचर ,संगणक ,कागदपञे जळून खाक झाले,माञ रोकड ठेवलेल्या तिजोरी कक्षापर्यत आगीचे लोण पसरणा-या पुर्वीच आग आटोक्यात आल्यामुळे रोकड सुरक्षित असल्याचे बँकेच्या अधिक-यानी सांगितले.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो अणि व्हिडिओ...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...