आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaijapur Filed Nomination Application 17 Candidate

वैजापुरात १७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर-तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी ५ ग्रामपंचायतींतून १७ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. आतापर्यंत दोन दिवसांत एकूण १८ अर्ज प्राप्त झाले असल्याची महिती प्रभारी तहसीलदार अभय बेलसरे यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आयोगाने प्रथमच ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र यात बदल करण्यात आला असून इच्छुक उमेदवारांनी आता फक्त नामनिर्देशन पत्र ऑनलाइन करावयाचे असून त्यासोबत घोषणापत्र व इतर दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने एका पत्रकाद्वारे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांची नामनिर्देशन

पत्र भरताना होणारी दमछाक कमी होणार आहे.
यात प्रथमच ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. वास्तविक पाहता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन अर्ज भरताना जारी केलेल्या सूचना पत्रात जर उमेदवारास नामनिर्देशन पत्रासोबत जोडत असलेले परिशिष्ट स्कॅन करून अपलोड करणे शक्य नसल्यास त्यांनी तहसील कार्यालयातील मदत कक्षाची मदत घ्यावी. तसेच जर उमेदवाराने परिशिष्ट अपलोड केले नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी ते अपलोड करतील. त्यासाठी उमेदवारांनी आपले युजर नेम व पासवर्ड संबंधितांना द्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करून उमेदवारांची दमछाक चालवली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातून कमी अर्ज प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. त्यामुळे मंगळवारी तालुका प्रशासनाने याबाबत एक सूचनापत्र जारी केले.
ग्रामपंचायतीनिहाय अर्ज दाखल करणारे उमेदवार
आघूर - हंसराज राऊत, पोखरी इंदुबाई ठुबे, शिऊर- नवनाथ आढाव, संदीप आढाव, राजेंद्र जाधव, रामेश्वर जाधव, सुलभ आढाव,गिरीश खंबायते, शशिकला जाधव व रईस शेख, खंडाळा- अब्बास शेख, साजिद पठाण,सतीश बागूल,वसंत मगर, नवाज पठाण,पंढरीनाथ मगर, वाकला- रेखा सोनी व अनिस शेख