आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर पालिकेच्या शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- नगर परिषदेच्या फुलेवाडी येथील सुंदरबाई गायकवाड प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. प्राथमिक शाळेला नगर परिषदेअंतर्गत आयएसओचा दर्जा प्राप्त होणारी ही राज्यातील पहिली शाळा ठरली आहे, अशी माहिती शाळेच्या प्रांगणात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देण्यात आली.
या कार्यक्रमात आयएसओचे प्रमुख अॅड. अविनाश औटे यांच्या हस्ते नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याध्यापक आर. के. सोमासे यांना आयएसओचे प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, विद्यार्थी सर्वंकष नोंदी, त्यांची गुणवत्ता व कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी या निकषांवर शाळेला आयएसओचा दर्जा दिला जातो, अशी माहिती औटे यांनी दिली. कार्यक्रमाला शिक्षण सभापती सिंधुबाई वाणी, मुख्याधिकारी बी. यू. बिघोत, धोंडिरामसिंह राजपूत, शिक्षणाधिकारी मनीष गणवीर, केंद्रप्रमुख उबाळे, प्रकाश बोथरा, अविनाश खांबेकर आदींची उपस्थिती होती.