आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेनेकडून गठित समितीला थेट मुख्यमंत्र्यांकडून खो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - राज्याच्या सत्तेत १५ वर्षांच्या खंडानंतर कारभारी झालेल्या भाजप -शिवसेना या मित्रपक्षांच्या एकमेकांशी जगजाहीर मतभेदाची लाट तालुकास्तरापर्यंत उसळली असल्याचे समोर आले आहे.
येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांत निराधारांना आधारभूत असलेल्या अशासकीय तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदावर आपले वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांतील संघर्षाची लढाई येथे सुरू
झाली आहे. दोन महिन्याभरापूर्वी तालुका पातळीवर पालकमंत्री रामदास कदम यांच्या विशेष शिफारशीवरून शिवसेनेत प्रभावशाली असलेल्या माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या अशासकीय तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समितीला भाजपच्या जिल्हाध्यक्षाने थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून समितीला स्थगिती आदेश मिळवत शिवसेनेला झटका दिला.
दरम्यान, या बेबनावाचा फटका मात्र निराधार लाभार्थींना बसणार आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्या शिफारशीवरून ऑगस्ट महिन्यात येथील अशासकीय तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समिती युती सरकारच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर गठित झाली होती. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तर सदस्यपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरणारे, माजी पंचायत समिती सदस्य देविदास जाधव, प्रवीण सोनवणे, पी. एम. शिंदे, अरुण शेलार यांची सदस्यपदी निवड करून उर्वरित सदस्यांच्या जागा मित्रपक्ष भाजपसाठी सोडण्यात आल्या होत्या. वैजापूर तालुक्यात शिवसेनेकडे तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे गेल्याने भाजपचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्याकडे थेट लेखी तक्रार केली. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी वैजापूर तालुक्यात भाजपला प्रतिनिधित्व न देता सेनेला झुकते माप दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
बातम्या आणखी आहेत...