आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vain Manner People Fear Gopinath Munde, Nephew Dhananjay Munde Remark

खासदार गोपीनाथ मुंडेंना लोक उगाच घाबरतात, पुतणे धनंजय मुंडेंचा टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड जिल्ह्यातील काहीजण उगाच घाबरतात. 20 महिन्यांपासून मी लढतोय. त्यांच्यात घाबरण्यासारखे काहीही राहिले नाही, असा दावा त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे यांनी केला आहे. पक्षाकडून आमदार झाल्याबद्दल राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते औरंगाबादेत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.


अध्यक्षस्थानी आमदार सतीश चव्हाण होते. धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्हा हा पूर्वीपासूनच राष्‍ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बीड आणि परळीत राष्‍ट्रवादीचाच विजय होईल. त्यासाठी तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुष्यातील 20 वर्षे भाजपमध्ये घालवल्यामुळे नरेंद्र मोदींवर भाष्य करण्याचा हक्क असल्याचा दावा करतानाच मोदी म्हणजे भाजपसाठी खड्डा खोदी असून त्यांचा ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे सांगितले. सन 2004 मध्ये फील गुडचे नियोजन करणा-यांच्या 24 जणांच्या पथकात माझा समावेश होता. बसल्या जागीच असे नियोजन करण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. हडकोतील राष्‍ट्रवादी भवनात झालेल्या या समारंभास माजी आमदार किशोर पाटील, सुरजतसिंग खुंगर, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, नगरसेवक अभिजित देशमुख उपस्थित होते.


धनंजयना राज्याचे नेतृत्व करण्याचा सल्ला
दरम्यान, या वेळी बोलताना माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय, कमाल फारुकी, मुश्ताक अहेमद, नीलेश राऊत, आमदार चव्हाण यांच्यापासून ते थेट सामंत अशा सर्वांनी धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातून बाहेर पडत राज्याचे नेतृत्व करण्याचा सल्ला दिला. राष्‍ट्रवादी हा तरुणांचा पक्ष असून त्यांनी राज्यातील तरुणांना एकत्रित करावे, अशी विनंती केली.


दिल टूटता है तो अच्छाही होता है
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच दिल तुटता है तो अच्छाही होता है या वाक्याने केली. जे झाले ते चांगले झाले. त्यामुळेच मी स्वाभिमानी पक्षात येऊ शकलो. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास झाले त्यापेक्षा अधिक वाटोळे होईल, अशी भीती मला घालण्यात येत होती. स्वाभिमानाला ठेच पोहोचल्याने मी या पक्षात आलो आणि शेवटच्या क्षणापर्यंत आता येथेच राहील, असेही ते या वेळी म्हणाले.