आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकोद धरणात पाण्याऐवजी पिके, नद्यांची क्षमता नसताना ७५ कोटी मातीत घालत बांधले धरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फुलंब्री तालुक्यातील वाकोद मध्यम प्रकल्प बांधून तब्बल दहा वर्षे झाली आहेत. या दहा वर्षांत या धरणात केवळ एकदाच आणि तोही फक्त २८ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यापूर्वी आणि नंतर एकदाही या धरणात पाणी आले नाही. या वर्षी फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही धरणात पाण्याचा टिपूसही नाही. ज्या दोन स्थानिक नद्यांवर हे धरण आहे, त्या नद्यांची क्षमता नसतानाही येथे धरण बांधले गेले, पण पाणी येईना म्हणून या धरणापासून ११ किमी अंतरावर असलेल्या गिरिजा नदीमधून जोडकालव्याद्वारे वाकोद धरणात पाणी अाणण्याच्या योजनेला २०१३ मध्ये तत्त्वत: मान्यता मिळाली. पण पुढे काहीच झाले नाही. अशा पद्धतीने या प्रकल्पाच्या नावाखाली आजपर्यंत ७५ कोटी रुपये ‘मातीत’ घातले. विशेष म्हणजे १९९२ मध्येे कोटी रुपयांची मान्यता मिळालेल्या धरणाची चार वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता झाली. त्यात कोटींचा प्रकल्प तब्बल ८७ कोटींवर पोहोचला.
१९९२ ला मंजुरी, चार वेळा सधारणा
या प्रकल्पाला १९९२ मध्ये काेटी ६५ लाख रुपयांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर १९९९ मध्ये २८ कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २००५ मध्ये २८ कोटींवरून ३४ कोटी ३६ लाख रुपयांची सुधारित मान्यता मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये तब्बल ५० कोटी ९३ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. आता पुन्हा चौथ्यांदा ८७ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. अशा पद्धतीने २६ वर्षांत चार वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देत कोटींचा प्रकल्प ८७ कोटी रुपयांवर पोहोचला; पण धरणात पाणी काही आलेच नाही.

कालवे,वितरिका बुजल्या
या धरणाच्या डाव्या बाजूने १३ किमी लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. त्यावर १३ वितरिकाही झाल्या. मात्र, २००६ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून एकदाही पाणी साठले नाही. परिणामी कालवे वितरिकाही मोकळ्याच राहिल्या. पाणीच येत नसल्याने त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी कालवे, वितरिका बुजवून त्यावर शेती सुरू केलीय, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे उगवल्याने येथे कालवा संपुष्टात आला आहे.

पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी

जोडकालव्याला तत्त्वत: मंजुरी
स्थानिकनद्यांंना पाणी येत नसल्याने येथून ११ किमी अंतरावर जोडकालवा काढून या धरणात गिरिजाचे पाणी वळवण्याला २०१३ मध्ये तत्त्वत: मान्यता मिळाली. सर्वेक्षणही झालेले असून या कालव्यासाठी १० कोटी रुपये अपेक्षित आहेत. आतापर्यंत ७४ कोटी खर्च झाले. १० कोटी मिळाले, तर धरणात पाणी तरी येईल.
हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष, डॉ. कल्याण काळे माजी आमदार
गिरिजाचे पाणी अशक्य
जर जोडकालव्याद्वारे पाणी आणणे शक्य नसेल, तर मग पाटबंधारे विभागाने विशेष सर्वेक्षण करून या योजनेला तत्त्वत: मंजुरी कशी काय दिली, हा खरा प्रश्न आहे.

बाजूलाच असलेल्या गिरिजा नदीमधून जोडकालवा काढून वाकोद प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना कशामुळे रखडली?
दहा वर्षांत वाकोद धरणात फक्त एकदाच पाणी आले. पाणीसाठाच होत नाही, धरणाची साइट
चुकली असे वाटते का?
थेट सवाल आजी आणि माजी आमदार या नात्याने
गिरिजा नदीपेक्षा वाकोद धरण उंचावर नाही. असे असते तर शासनाने गिरिजातून जोडकालव्याला तत्त्वत: मंजुरी दिलीच नसती. गिरिजाचे पाणी आणण्याव्यतिरिक्त पर्यायच नाही.

गिरिजातून जोडकालव्याद्वारे पाणी आणणेच योग्य. अन्यथा प्रकल्प कायम कोरडा राहील. आमचे सरकार असताना त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली होती.
ज्या वेळी या प्रकल्पासाठी सर्वेक्षण झाले होते, तेव्हा नागझरी उंदीरनाला या दोन्ही नद्यांना मुबलक पाणी असायचे. धरणाची साइट योग्यच अाहे.
याबाबत मला माहिती नाही, तरीही मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणी चर्चा करतो. खरेच गिरिजा नदीमधून पाणी आणणे शक्य आहे का, हे पाहतो.
गिरिजा नदीपेक्षा वाकोद प्रकल्प उंचावर आहे. त्यामुळे नदीचे पाणी वाकोद प्रकल्पात येणार नाही. जोडकालव्याद्वारे पाणी आणणे अशक्य वाटते.
धरणाच्या वरच्या भागामध्ये पाऊस कमी झाला आहे. पाऊसच नसल्याने पाणी येणार कुठून? त्यामुळे साइट चुकली, असे म्हणता येणार नाही.

धरणात कसली जाते शेती
जेव्हापासून धरण झाले, तेव्हापासून केवळ २०१२ चा अपवाद वगळता एकदाही पाणी आले नाही. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी पुन्हा येथे शेती कसायला सुरू केले आहे. आजही धरणाच्या आतील बाजूला भिंतीला लागून शेतकऱ्यांची पिके पाहायला मिळतील.

असे आहे धरण
वाकोद गावापासून जवळच असलेल्या लेहावाडी, विरमगाव या दोन गावांचे पुनर्वसन करून नागझरी आणि उंदीरनाला या दोन स्थानिक नद्यांवर वाकोद प्रकल्प बांधला. या धरणाची १२ दलघमी एवढी साठवणक्षमता, तर अडीच हजार हेक्टर एवढी सिंचनक्षमता आहे. डाव्या बाजूने १३ किमी लांबीचा कालवा काढून त्यावर वितरिका काढल्या. १८ गावांसाठी या धरणाचे पाणी मिळणार होते, पण दुर्दैवाने ते मिळाले नाही.

निधीसाठी पाठपुरावा करतोय
पर्जन्यमान कमी झाल्याने या धरणात पाणी येत नाही. त्यामुळे २०१३ मध्ये गिरिजा नदीतून जोडकालव्याद्वारे पाणी वळवण्याच्या योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. गिरिजातून पाणी आणणे शक्य असल्यानेच शासनाने या योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली असेल. निधीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. -ए.एम. निंभोरे, कार्यकारीअभियंता, लघु पाटबंधारे विभाग, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

काय म्हणतात शेतकरी ?
आमच्या शेतजमिनी नाहक अडकवून ठेवल्या. धरण बांधलं तेव्हापासून पाणीच नाही. भूसंपादनाचेही पूर्ण पैसे मिळाले नाहीत. सातबाऱ्यावरून शेती गेली, घरेही उठवली. ज्या ठिकाणी पुनर्वसन केले, तिथेही पूर्ण सुविधा दिल्या नाहीत. -श्यामकौरराजपूत, लेहावाडी,ता.फुलंब्री
ज्यानद्यांवरधरण बांधले, त्यांना पूर्वीही कमीच पाणी येत होते. क्षमतेपेक्षा मोठे धरण इथे बांधले गेले. आतापर्यंतचा खर्च मातीत जाऊ नये, असे वाटत असेल तर तत्काळ गिरिजा नदीतील पाणी या धरणात आणले पाहिजे. अन्यथा कालवे जसे बुजले, तसेच धरणही नाहीसे होईल. -नानासाहेबभाले, पाथ्री,ता.फुलंब्री
बातम्या आणखी आहेत...