आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डे'ला टॉकिंग टेडीने करा प्रेम व्यक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-
‘हमहसीन होने का दावा तो नहीं करते,
मगर हां, जिससे भी प्यार करते हैं
आज उससे प्यार का इजहार करते हैं !
असा संदेश टॉकिंग टेडीमध्ये रेकॉर्ड करून यंदा अनेक प्रेमीयुगुले प्रेम व्यक्त करणार आहेत. खास "व्हॅलेंटाइन डे'निमित्त बाजारात गिफ्ट घेण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठ मंडळींची गर्दी होत आहे. प्रेम व्यक्त करण्यात संकोच वाटणाऱ्यांचा मदतीला टॉकिंग टेडी, लव्ह टी कप बाजारात आले आहे. यात तुमच्या मनातील भावना रेकॉर्ड करून ते गिफ्ट आवडत्या व्यक्तीला भेट देता येणार आहे.
व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठ खास विविध प्रकारच्या गिफ्ट्सनी फुलली आहे. खरे तर "प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते' असे म्हटले जाते. त्यासाठी काेणताही एक दिवस नसतो. रोजचा दिवस हा प्रेमाचाच असतो. व्हॅलेंटाइन डे हा फक्त प्रेमीयुगुलांसाठीच नव्हे तर आई-बाबा, बहीण-भाऊ, मित्र -मैत्रिणीही साजरा करतात. यानिमित्त गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केले जाते. आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यासाठीची भेटवस्तू काही वेगळी असावी, असे वाटणाऱ्यांसाठी खास आकर्षक असे गिफ्ट्स बाजारात आले आहेत. हे गिफ्ट २५ रुपयांपासून ते हजारांपर्यंत आहेत.
रिंग, टेडी खरेदीला पंसती
^प्रेमव्यक्त करण्यासाठी वयाचे बंधन नसते. गिफ्ट खरेदी करण्यात तरुण आणि मध्यम वयोगटाबरोबरच ज्येष्ठ मंडळीदेखील आहेत. अनेक जण चॉकलेट्स, रिंग आणि टेडी खरेदीला पसंती देत आहेत. अतुलचंंगेडिया, अक्षय गिफ्ट्स गॅलरी, विक्रेते

पाच हजारांचे चॉकलेट-
"चॉकलेटडे'निमित्त खास हार्ट आणि रॉचर अमेरिकी ब्रँडच्या चॉकलेट्सना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत याची किंमत आहेत. एका तरुणाने प्रेम व्यक्त करण्यासाठी पाच हजार रुपयांचे चॉकलेट खरेदी केले.

लव्ह टी कप
सकाळीचहा पिताना प्रिय व्यक्तीची आठवण करून देण्यासाठी खास लव्ह टी कप बाजारात आले आहेत. या कपामध्ये खास प्रेमसंदेश रेकॉर्ड करून ठेवता येऊ शकतो. चहा पिण्याचा आनंद आणि प्रिय व्यक्तीच्या मनातील भावना ऐकता येऊ शकतात. हे कप २५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहेत.

टॉकिंग टेडी
कॅटरिनाडॉल, ट्विटी, डोरेमाॅन, झुझू तसेच कपल डॉल आदी प्रकार विक्रीला आले आहेत. मनातील भावना टेडीसमोर व्यक्त करा, त्या रेकॉर्ड झाल्यावर तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेट द्या. पॅकिंग उघडताच प्रेमसंदेश प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचतो. विविध प्रकारचे टेडी २५ रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत आहेत.