आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी दिले व्हॅलेंटाइन गिफ्ट, चोरीला गेलेल्या तीन दुचाकी, एक रिक्षा दिली शोधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चोरीला गेलेले वाहन परत मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र, एखाद्याने आशा सोडून दिली असेल आणि पोलिसांकडून गाडी सापडल्याचा निरोप मिळाला तर आनंदाला पारावार उरत नाही. असाच सुखद धक्का शनिवारी क्रांती चौक पोलिसांनी शहरातील चौघांना दिला. आपली गाडी परत मिळाल्यामुळे त्यांचा व्हॅलेंटाइन डे स्पेशल झाला.
क्रांती चौक पोलिसांनी शनिवारी चार जणांना फोन करून ठाण्यात बोलावले. चोरी गेलेली गाडी सापडल्याची सुखद बातमी देत तोंड गोड करून त्यांची गाडी परत दिली. या वेळी पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, उपनिरीक्षक ए. व्ही. सातोरकर, आय. जी. नरके, रमाकांत पठारे, हरी कवडे यांची उपस्थिती होती. या वेळी रमेश कोंदलकर यांची शाइन, नारायण जाधव यांची सीबीझेड, योगेश कुंडलवाल यांची हीरो होंडा स्प्लेंडर आणि शेख हबीब शेख मेहबूब यांची रिक्षा परत करण्यात आली.
अकोल्यालासापडली गाडी
भवानीनगरयेथील रमेश कोंदलकर हे ११ जून २०१४ रोजी सकाळी आपल्या भावाला सोडण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात गेले असता त्यांची गाडी चोरीला गेली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सहा महिने झाले तरी गाडीचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी अाशा सोडून दिली. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेतील सुनील पाटील यांचा त्यांना फोन आला आणि दुचाकीची माहिती विचारली. अकोल्यातील पातूर तालुक्यातील चांदोर येथे चोरटे ही गाडी विकण्याच्या प्रयत्नात असताना तेथील गुन्हे शाखेचे कर्मचारी मुन्ना ठाकूर यांनी त्या टोळीला पकडले होते. गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुडगाव दिल्ली येथे चेसिस नंबर कळवल्यानंतर गाडी कोंदलकरांची असल्याचे समजले.