आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भराडीतील वीज कार्यालयात राडा, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - भराडी येथील महावितरणच्या कार्यालयावर राडा करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वीज अभियंत्याच्या तक्रारीवरून वांगी खुर्दच्या पाच शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भराडी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल शिवलिंग जंगम यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, वांगी खुर्दचे शेरखाँ पठाण, सांडू महाकाळ, नामदेव मुरकुटे, कृष्णा मुरकुटे, नानासाहेब मुरकुटे हे सोमवारी (दि. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयात आले व त्यांनी फर्निचरची तोडफोड करून सात हजार पाचशे रुपयांचे नुकसान केले. वीजपुरवठा खंडित करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.