आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धन खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक पुण्याला रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद- वर्धन खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे रविवारी पथक पुण्याला गेले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अभिलाष ऊर्फ अभिराज मोहनपूरकर आणि संशयित इंद्रनील पाठक हे दोघे महाशिवरात्रीच्या दिवशी २४ फेब्रुवारी रोजी पुण्याला गेले होते. त्याच वेळी अभिराजने रेकी केली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इंद्रनील मोपेड गाडीवर पुण्याला जंगली महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिराज होता. 
 
अभिराजने पुण्यात काही लोकांची भेट घेतली. शिवाय शिरूरला लागून असलेल्या घोड नदी आणि हॉटेल सुवर्णज्योत आणि स्माइल स्टोनसमोरील रस्त्याची रेकी केली होती. या ठिकाणी काही पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी सापडतात का याचा तपास करण्यासाठी पथक पुण्याला गेले आहे. आरोपी अभिराजने घटनेच्या दिवशी जी पाच कोटींची मागणी करणारी चिठ्ठी वर्धनच्या घरात आणून दिली होती. त्यात पैसे सुवर्णज्योत आणि स्माइल स्टोनच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर आणून द्या, असे लिहिले होते.
 
 पुण्यात अभिराजने कोणकोणत्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या याचाही तपास पथक करणार आहे. पथकामध्ये जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, डी. बी. कोपनर, पोलिस नाईक एस. आर. बडगुजर, वीरेश बने, शेख नवाब शेख गफार यांचा समावेश आहे. 
 
वर्धनला घोड नदीत फेकून दिले तर काय होईल? 
अभिराज हा इंद्रनीलच्या गाडीवर पुण्याला गेला होता. येताना ते शिरूरजवळच्या घोड नदीजवळ थांबले. त्या वेळी अभिलाषने इंद्रनीलला विचारले, एखाद्याला पुलावरून खाली फेकले आणि तो मेला तर तो किती दिवसांनी लोकांना दिसू शकेल. त्या वेळी इंद्रनीलला याचा संदर्भ माहिती होता की नव्हता, याचा पोलिस शोध घेत आहेत. अभिराजने गेल्या एक वर्षात टिळकनगर भागातील अनेक मुलांवर पाळत ठेवल्याचे तपासात पुढे आले आहे.
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी आणि फोटो पाहा.... 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...