आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धन Murder : आरोपींनी बीअरबारमध्ये रचला होता कट, आणखी एक ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकेतील ठेवींवरच्या व्याजाचे सुमारे ४० हजार रुपये दरमहा वर्धनच्या नावावर येत होते. ही माहिती मिळाल्याने आरोपींनी त्याचा खून केला असावा का, या दिशेनेही तपास सुरू - Divya Marathi
बँकेतील ठेवींवरच्या व्याजाचे सुमारे ४० हजार रुपये दरमहा वर्धनच्या नावावर येत होते. ही माहिती मिळाल्याने आरोपींनी त्याचा खून केला असावा का, या दिशेनेही तपास सुरू
औरंगाबाद- टिळकनगर येथील वर्धन घोडे या दहा वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी पोलिसांनी आणखी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेले आरोपी अभिराज, श्याम यांनी बिअरबारमध्ये चार तास बसून खुनाचा कट शिजवला होता, अशी माहिती समोर आली आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

खुनाचे षडयंत्र रचण्यात अभिराज, श्याम यांच्यासोबत आणखी एकजण आहे, असा पोलिसांचा ठाम विश्वास आहे. त्या दिशेने गेले दोन दिवस चौकशीची चक्रे फिरवली जात आहेत. त्यातील पहिला धागा त्यांना मिळाला असून एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरुण षडयंत्रातील आरोपी आहे किंवा नाही, याविषयी आणखी माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. खून करण्याच्या एक-दोन दिवस आधी श्याम, अभिराज एका बिअर बारमध्ये बसले होते, असे समोर आल्यावर तेथील फुटेजही पोलिसांनी मिळवले. दौलताबादच्या घाटाजवळ आरोपी वर्धनचा गळा आवळत असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांना पाहिले होते. हे नेमके कोण होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. 

शामने पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी लिहिली होती. ती शुक्रवारी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली. दरम्यान, अभिराज, श्याम टिळकनगरातील इतर सधन कुटुंबातील चिमुकल्यांना फिरायला घेऊन जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. यामागे त्यांचा काय हेतू होता, हेही पोलिस तपासत आहेत. श्यामने त्याचे प्राथमिक शिक्षण उदगीर, देगलूर येथे झाले तर दहावीची परीक्षा २०१२ -१३ मध्ये औरंगाबादेतून दिल्याचे सांगितले. वर्धनच्या नावावर त्याच्या वडिलांनी सर्व संपत्ती केली होती. बँकेतील ठेवींवरच्या व्याजाचे सुमारे ४० हजार रुपये दरमहा वर्धनच्या नावावर येत होते. ही माहिती मिळाल्याने आरोपींनी त्याचा खून केला असावा का, या दिशेनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...