आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडचा २०० वा प्रयोग रविवारी औरंगाबादेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रसिक प्रयोग झाल्यावर माझी वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडेशी तुलना करतात. खरेतर त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मी माझ्या पद्धतीने सादरीकरण करतो. वऱ्हाडमध्ये माझा जीव गुंतला असून तो जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे वऱ्हाड निघालंय लंडनला सादर करणारे प्रख्यात अभिनेते संदीप पाठक यांनी सांगितले.
वऱ्हाडचे तीन हजार प्रयोग पूर्ण करून गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचे स्वप्न प्रा. डॉ. देशपांडे यांनी पाहिले होते. मात्र २८०० प्रयोग झाल्यानंतर त्यांचे निधन झाले अन् वऱ्हाड थांबले. मूळ मराठवाड्यातील कलावंत असलेल्या संदीप यांनी डिसेंबर २०१२ ला औरंगाबादेतून नव्या रुपात वऱ्हाडचे सादरीकरण सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आता २०० वा प्रयोग १९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तापडिया नाट्य मंदिरात होणार आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पाठक यांनी त्यांचा नाट्य-चित्रपटसृष्टीतील प्रवास सांगितला.
घडलंय बिघडलंय, हसा चकट फू, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त श्वास तसेच एक डाव दोन घडीचा डाव, येड्यांची जत्रा, एक हजाराची नोट आदी चित्रपटात भूमिका करण्याचा अनुभव वऱ्हाड करताना उपयोगी ठरला, असे ते म्हणाले. वऱ्हाडच्या २०० व्या प्रयोगानिमित्त ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे. प्रयोगाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.