आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवानिमित्त ‘दिव्य मराठी’तर्फे विविध स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘गणपतीबाप्पा...’ हे शब्द कानी पडताच ‘मोरया’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गणेशोत्सवातील १० दिवस पावला-पावलावर हे शब्द कानी पडतात. यंदा ‘दिव्य मराठी’ने औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि स्वाद व्हेज रेस्टॉरंट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे खास नियोजन केले आहे. यात ढोल पथके, सार्वजनिक गणेश मंडळे आणि महिलांसाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्वोत्कृष्ट ढोल पथक स्पर्धा, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सर्वाेत्कृष्ट इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा, सर्वोत्कृष्ट गणपती सजावट तसेच महिलांसाठीच्या मोदक लाडू बनवणे आणि रांगोळी उखाणे स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी दिव्य मराठी कार्यालय किंवा औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे बाळू औताडे यांच्याशी संपर्क साधावा.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी स्पर्धा : दैनिक दिव्य मराठीने सार्वजनिक गणेश मंडळांसाठीही गणरायाचे आगमन ते विसर्जनापर्यंत विविध स्पर्धा घेण्याचे नियोजन केले आहे. यात सर्वाेत्कृष्ट इको-फ्रेंडली गणेशमूर्ती आणि सर्वाेत्कृष्ट गणपती सजावट या दोन स्पर्धांचा समावेश असून सर्व सार्वजनिक गणेश मंडळे यात सहभागी होणार आहेत.

महिलांसाठी स्पर्धा
महिलांसाठीमोदक लाडू बनवण्याची स्पर्धा घेतली जाणार असून त्याला रांगोळी, उखाणे स्पर्धेची जोड दिली जाणार आहे.

ढोल पथक स्पर्धा
गणेशोत्सवाला मराठमोळे रूप देण्यासाठी ढोलसारखे दुसरे वाद्य नाही. त्यामुळेच सर्वोत्कृष्ट ढोल पथक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून गणेश भक्तांत चैतन्य निर्माण करणाऱ्या या स्पर्धेत औरंगाबाद शहरासह राज्यभरातील विविध नामवंत ढोल पथके सहभाग नोंदवून आसमंत दणाणून सोडणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...