आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसईची दोन मुले औरंगाबादेत सापडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सुधारगृहातून पळून गलेल्या दोन मुलांनी पोलिसांच्या भीतीपोटी अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. रेल्वे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री या मुलांना पकडून रेल्वे सुरक्षा दल जवानांच्या स्वाधीन केले होते. या अपहरण नाट्यामधून जितेंद्र प्रजापतीला 13 महिन्यांनंतर त्याचे आईवडील मिळाले.
सोमवारी या दोघांनी सुधारगृहातून पलायन करत रेल्वेस्टेशन गाठले. जितेंद्रला मुंबईला आईच्या भेटीला जायचे होते. मात्र तो नांदेडला जाणार्‍या गाडीत बसला. नांदेडला पोहोचल्यावर दुसर्‍या गाडीने मुंबईचा प्रवास सुरू केला तेव्हा औरंगाबाद रेल्वे पोलिसांच्या हाती लागला. सुधारगृहातील शेख अजिम शेख रमजानी वय 10 वर्षे, रा. साजापूर आणि जितेंद्र राजपाल प्रजापती वय 12 वर्षे, रा. वसई हे दोघे वर्षापूर्वी हडकोतील शासकीय वसतिगृहात दाखल झाले होते. जितेंद्र इयत्ता सहावीत असताना शाळेत जात नव्हता. वसई भागात त्याला गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी पकडून सुधारगृहात ठेवले. त्यानंतर त्याची रवानगी औरंगाबादच्या सुधारगृहात करण्यात आली. जितेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार वसई पोलिस स्टेशनमध्ये 26 जून 2011 रोजी दिलेली आहे. त्याचा भाऊ जितेंद्र त्याला घेण्यासाठी मुंबईवरून औरंगाबादकडे निघाला आहे.