आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; औरंगाबादमधून वैष्णवी सिकची ९७.६ टक्के गुण मिळवून प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सेंट्रलबोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल रविवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदाही मुलींनी बाजी मारली असून विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या िवद्यार्थ्यांत मुलीच पुढे आहेत. औरंगाबाद शहरातून प्रथम येण्याचा मान स्टेपिंग स्टोन स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सिकची (९७.६%) हिने तर िद्वतीय क्रमांक तन्वी वेलंगीने (९७.४) पटकावला. 

सीबीएसईच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सकाळी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून अकरा लाख विद्यार्थी बसले होते. तर औरंगाबादमधून जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. शहरातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे. मागील वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८३.५ टक्के होती. ती यंदा ८२ टक्के झाली आहे. यंदा १०,०९१ विद्यार्थ्यांनी ९५ ते १०० टक्के गुण मिळवले आहेत. ही संख्या मागील वर्षी ९,३५१ होती.
 
मॉडरेशन पॉलिसीच्या आधारावर निकाल...
यंदा महाविद्यालयांमधील कट ऑफला आळा घालण्यासाठी सीबीएसईने मॉडरेशन पॉलिसी रद्द केली होती. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या प्रश्नांसाठी ग्रेस गुण देण्यात येतात. यंदा दिल्ली उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बोर्डाने यंदाच्या परीक्षेत बदल करता पुढील वर्षी तो लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. फिजिक्स, मॅथ्सचा पेपर टफ होता. त्यामुळे देशभरातून सीबीएसईकडे तक्रारीही आल्या होत्या. कॉमर्सचा निकाल मात्र चांगला लागला अाहे. मेडिकल, इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये करिअरचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळेच कॉमर्समध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे. 

अभ्यासासह आवडही जपली...
नियमितअभ्यास, सराव करण्याबरोबरच मी आवडीच्या सर्व अॅक्टिव्हिटीत सहभागी होत राहिले. शाळेतील नियमित तासिका आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे चांगले यश मिळवता आले. मला सीए व्हायचे आहे, असे तन्वी वेलंगी म्हणाली. 

नियोजनामुळे मिळाले यश 
मी शारदामंदिर प्रशालेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मी सीबीएसई पॅटर्नमधून अकरावी, बारावी केले. नियोजन करून अभ्यास केल्यामुळेच चांगले गुण मिळवू शकले. मला सीए व्हायचे आहे.
- वैष्णवी सिकची, विद्यार्थिनी  

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन 
बारावीबोर्ड परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन नि:शुल्क असून यासाठी १८०००११८००४ क्रमांक देण्यात आला आहे. ६५ तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...