आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मेथी 20 रुपये जुडी, तर मिरची 70 रुपये किलो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बाजारात पालेभाज्यांचे दर प्रचंड कडाडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी 10 रुपयास मिळणार्‍या मेथीच्या जुडीचे दर दुपटीने वाढून 20 रुपयांपर्यंत गेले आहेत. पालकही 10 ते 15 रुपये जुडी, मिरची 60 ते 70 रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. कांद्याची मात्र पाच ते दहा रुपये किलो या दराने विक्री होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला.

पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी मुश्किलीने मिळते. अशा परिस्थितीत माळवे पिकवण्यासाठी पाणी मिळणे अवघड होऊन बसले. त्यामुळे पाण्याची वानवा झाल्याने शेतकर्‍यांनी माळवे काढणेच बंद केले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या 25 तारखेपासून बाजारातून शेपू आणि आंबट चुका गायब झाला आहे. गेल्या महिन्यात दररोज बाजार समितीत सात-आठ हजार मेथीच्या जुड्या येत होत्या. ही आवक घटली असून आता दररोज केवळ दोनशे ते तीनशे मेथीच्या जुड्या विक्रीसाठी येत आहेत. गेल्या महिन्यात पालकाची दहा ते पंधरा हजार जुड्यांची आवक होत होती. आता आठशे ते एक हजार जुड्याच येत आहेत. मेथी, पालक औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी, मांडकी, कोलठाणवाडीतून उपलब्ध होत आहे. कांद्याने दिला दिलासा : मागील महिन्यात दररोज 700 ते एक हजार क्विंटल कांदे बाजारात आले. त्याचा दर दहा ते बारा रुपये किलो होता. या महिन्यात मात्र दररोज दोन ते चार हजार क्विंटल कांद्याची आवक होत असल्याने किलोमागे पाच ते आठ रुपये दर आहे.


भाजी पूर्वीचे दर आताचे दर रु.
मेथी 8 ते 12 (जुडी) 15 ते 20
पालक 7 ते 10 (जुडी) 10 ते 13
कोथिंबीर 8 ते 10 (जुडी) 10 ते 15
वांगी 30 ते 40 (किलो) 40 ते 50
भेंडी 30 ते 40 (किलो) 40 ते 50
हिरवी मिरची 40 ते 50 (किलो) 60 ते 70
गवार 30 ते 35(किलो) 35 ते 45
कोबी 25 ते 35 (किलो) 35 ते 40


.तर मेथी, पालक गायब होईल
सध्या माळवे काढणे बंद केले. 15 जूनपर्यंत मेथी, पालक उपलब्ध होईल. त्यानंतर बाजारातून या भाज्या गायब होण्याचे संकेत आहेत. एस. एस. गायकवाड, बाजार अधीक्षक.