आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची ‘तिखट’ झाल्याने बजेट कोलमडले; मिरची ६० ते ८० रुपये किलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूजच्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात टोमॅटो व हिरवी मिरची तब्बल ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत असून इतर पालेभाज्यांचाही ६० ते ७० रुपये किलो भाव असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

नगर - औरंगाबाद महामार्गाला लागून शासकीय भूखंडावर मागील ४० वर्षांपासून आठवडे बाजार भरतो. पूर्वी कमी लोकसंख्येचे गाव असल्याने सकाळी सातला भरलेला बाजार साडेदहाला संपून जायचा. आता मात्र, वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे गावाची व परसिराच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने तुलनेत बाजारही मोठा भरत असून तो आता १४ तास भरतो. अनेक व्यापारी एक दवसि अगोदरच रात्रीला मुक्कामी येतात. जालना, नगर, औरंगाबाद, शेवगाव, नेवासा, गंगापूर, कन्नड, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर व परसिरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर व्यापारी तसेच शेतकरीवर्ग भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येतात. यंदा पावसाळा सुरू होण्यास तब्बल दीड महनि्यांचा कालवधी उलटला. परिणामी परसिरातील किलोच्या पाण्याची पातळी खोलवर गेली. पाणीसाठे कोरडे पडले. याचा विपरति परिणाम होऊन भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे ज्यांच्या किलोना बर्‍यापैकी पाणी आहे,त्यांनी भाजीपाल्याची पिके घेतली आहेत.
टोमॅटोसह फळभाज्याही महागल्या
आठवडे बाजारात सोमवारी टोमॅटो व मिरचीला ८0 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. फुलकोबी व पत्ताकोबीला ७० रुपये प्रतिकिलो, वांगी ६० तर बटाटे २५ रुपये किलोने विक्री झाले. परसिरात पाऊस सुरू झाल्याने येत्या काही दवसिात भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.