आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगमपुर्‍यातील वकिलाच्या घरातील चार वाहने जाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बेगमपुर्‍यातील अँड. निरंजन प्रकाश पांडे (38) यांची एक कार व तीन दुचाकी अज्ञात माथेफिरूने बुधवारी (4 सप्टेंबर) पहाटे पाचच्या सुमारास पेटवून दिल्या. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतलामाता मंदिराजवळ राहणारे पांडे यांची चारही वाहने त्यांचे बंधू अनिल पांडे यांच्या घराच्या आवारातील शटरमध्ये नेहमीप्रमाणे उभी केलेली होती. आज पहाटे पांडे यांच्या शेजारी संजय चौधरी यांना अर्धवट शटर उघडे असून त्यातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आत डोकावले असता स्विफ्ट कार (एमएच-20-बीसी-8456), टीव्हीएस स्कूटी (एमएच-20-बीए-7163), हीरो होंडा प्लेजर (एमएच-20-बीएच-4292) आणि हीरो होंडा मेस्ट्रो (एमएच-20-सीएन-7159) या दुचाकी जळत असल्याचे दिसले. याची माहिती चौधरी यांनी पांडे कुटुंबीयांना दिली. यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वाहने भस्मसात झाली होती. बेगमपुरा पोलिस तपास करत आहेत.