आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"१०९' वे वाहन जाळले, माथेफिरूचा पुन्हा उच्छाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरपरिसरात दुचाकी कार पेटवून आसुरी आनंद घेणाऱ्या विघ्नसंतोषींनी पुन्हा डोके वर काढले आहे. ऑगस्ट २०१४ रोजी माथेफिरूंनी वाहन जाळले होते. त्यानंतर चार महिने वाहने जाळण्याचे सत्र बंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असतानाच पुन्हा बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटे आरएक्स १६ येथील प्रदीप शिवप्रसाद तिवारी (२३) यांची पल्सर दुचाकी जाळण्यात आली. याच कॉलनीत जळणारे हे सतरावे वाहन आहे.
बजाजनगरात दुचाकी अथवा चारचाकी वाहन अंगणात जागा मिळेल तिथे उभे करावे लागते. अनेक कामगार कंपनीत ये-जा करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढून वाहन खरेदी करतात. मात्र, पै-पै पैसा गोळा करून खरेदी केलेले वाहन विघ्नसंतोषी माथेफिरूंकडून पेटवले जाते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. त्यात आतापर्यंत १०९ वाहने भस्मसात झाली आहेत. त्यामध्ये ७७ दुचाकी ३२ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
एकाचकॉलनीत १७ वे वाहन : सिद्धिविनायकगणेश मंदिर परिसर ते छत्रपतीनगर मार्गादरम्यान सर्वाधिक १७ वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामागे काय कारण आहे, असा सवाल संतप्त नागरिकांतून उपस्थित होत आहे. याच परिसरामध्ये पूर्वी वाहने जाळणारा माथेफिरू वाहन जाळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
होऊनही अद्याप त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिस प्रशासनाला का यश आले नाही?
एकचपद्धत : आतापर्यंतवाहन जळाल्याच्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर वाहने जाळणारा माथेफिरू एकटा आहे. त्याची वाहन पेटवून देण्याची पद्धत वेळ ठरलेली आहे. तो मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास वाहन जाळण्याचे काम करतो. वाहनाच्या मागील समोरील भागावर ज्वलनशील पदार्थ टाकून वाहन पेटवून दिले जाते. अनेकदा माथेफिरू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, तोंडाला रुमाल बांधल्यामुळे त्याची ओळख पटत नाही.
७७ दुचाकी वाहने
३२ चारचाकी वाहने
२:०० वाजेच्या सुमारास जाळण्याचे काम
- घटना घडूच नये यासाठी पोलिस काय नियोजन करतात? आणखी किती वाहने जळण्याची वाट पाहणार आहेत? नागरिक, पोलिस यांच्या संयुक्त विचारातून यावर मार्ग निघू शकतो. परंतु त्यासाठी सध्याचे पोलिस अधिकारी पुढाकार घेत नाहीत. मारुतीिहंगणे, रहिवासी
-पै-पै गोळा करून घेतलेले वाहन डोळ्यादेखत जळताना पाहिल्यास खूप त्रास होतो. पूर्वी पोलिसांचे वाहन नियमित फिरत होते. आता ते कमी झाले आहे. वाहन जाळण्याच्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी काहीतरी करावे. सुरेखामाने, रहिवासी