आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र अन्य आरटीओतून मिळणार: परिवहनमंत्री रावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाहनाची नोंदणी ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) केलेली आहे, तिथेच वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणपत्र) मिळवण्याची अट शि.थिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेजारच्या आरटीओत किंवा फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याच्या तारखेला संबंधित वाहन जिथे प्रवास करत असेल त्या क्षेत्रातील आरटीओतून हे प्रमाणपत्र मिळवता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी दिली. 


फिटनेस प्रमाणपत्र वेळेत मिळाल्याने वाहनधारकांची (विशेषत: मालवाहू वाहनांची) होणारी गैरसोय, त्याचा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर होणारा परिणाम, त्यातून भडकणारी महागाई, भाजीपाला- अन्नधान्याचा तुटवडा आदी समस्या टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक विभागाने पूर्वी आंतरराज्य प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी असा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय राज्यात आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी घेण्याचा विचार राज्य सरकार करत होते. 


यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
वाहनधारकाने वाहनाची नोंदणी केलेल्या जिल्ह्यात फिटनेस प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा यादी मोठी असेल तर संबंधित वाहनधारकाला नजिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. त्याचबरोबर फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या काळात संबंधित वाहन जर दुसऱ्या आरटीओ क्षेत्रात प्रवास करीत असेल तर तिथेच त्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळवता येऊ शकेल. राज्यातील अनेक वाहनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. बैठकीस परिवहन, सार्वजनिक बांधकाम, विधी न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


गैरसाेय टळणार 
फिटनेसप्रमाणपत्राच्या प्रक्रियेतील विलंब आणि गैरव्यवहाराला आता आळा बसेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार त्यातील अटी शर्तीचे पालन करून हे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...