आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटननगरीत दिवसागणिक १९८ वाहनांची पडते भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यटननगरीतील वाहनांची संख्या वरचेवर वाढत चालली असून आरटीओ कार्यालयाने घेतलेल्या नोंदीनुसार एप्रिल ते ३० ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत दिवसागणिक रस्त्यावर १९८ नवीन वाहनांची भर पडली आहे. गत साडेपाच वर्षांत वाहनांची संख्या दुपटीने वाढून ती ११ लाख ४४ हजार ५७ वर पोहोचली आहे.
३१ मार्च २०११ रोजी वाहनांची संख्या लाख ३४ हजार ९०९ एवढी होती; पण वाहन आज गरजेची वस्तू झाल्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत दिवसागणिक १९८ म्हणजेच २१० दिवसांत ४१ हजार ४१३ नवीन वाहनांची भर पडली असून एकूण वाहनांची संख्या ११ लाख ४४ हजार ५७ वर गेली आहे. दररोज नवीन वाहनांची भर पडत असल्याने आरटीओ, पोलिस प्रशासन शहरवासीयांच्या समस्याही वाढल्या आहेत.

पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा : एकीकडेनवीन वाहनांची संख्या वेगाने वाढत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला जागोजागी रस्त्यांची चाळणी झालेली आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक वारंवार ठप्प होत असते. त्यातच पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने जिकडे जावे तिकडे वाहने रस्त्यात अाडवीतिडवी उभी केलेली असतात. याचा सर्वांनाच फटका बसतो. अडकून पडणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय होतो, शिवाय अपघातही होतात.

यंदा दसरा आणि दिवाळीच्या महिन्यात १४ हजार ३८७ नवीन वाहनांची भर पडली. गत साडेपाच वर्षांत मोटारसायकल, स्कूटर, तीन चारचाकी डिलिव्हरी व्हॅन, टँकर, ट्रक लॉरीज, खासगी वाहन, स्कूल बस, टुरिस्ट कॅब्सच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, तर मोटारकार, जीपच्या संख्येतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. ऑटोरिक्षांच्या संख्येत तीन हजारांनी वाढ झाली आहे.

वाहनांची संख्या वाढत चालली आहे. यावर नियंत्रणासाठी आयुष्यमान संपलेल्या वाहनांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे. तसेच दर सहा महिन्यांनी वाहनांची तपासणी करणे बंधनकारक आहे, पण याकडे आरटीओ, प्रदूषण विभाग, पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. अपायकारक वायू सोडणाऱ्या वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. त्याचे मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि जीवसृष्टीवरही परिणाम होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...