आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन डे व्हॉट्स अप, वी चॅटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निर्जन स्थळी एकांतवास शोधण्याच्या भानगडीत न पडता मोबाइल टू मोबाइल प्रेमसंदेश आणि हव्या त्या छायाचित्राची आदान-प्रदान करण्याचा ट्रेंड शहरात आल्याचा प्रत्यय आज (गुरुवारी) आला. फेसबुक, ट्विटर, वी चॅट आणि व्हॉट्स अपवरूनच अनेकांनी प्रेम जाहीर केले. फेसबुकवर तर ‘व्हॅलेंटाइन्स’नी खास पेज सेट करून ठेवले आहेत.
इंटरनेटमुळे सण, उत्सव आणि असे खास दिवस साजरे करण्याचा ट्रेंड आता आमूलाग्र बदलला आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचे फॅड बरेच वाढले. यंदा मात्र व्हॅलेंटाइन डेला सोशल मीडियाची साथ मिळाली. त्यामुळे कपडे, सोने, भेटकार्ड, भेटवस्तू आदी वस्तूंची खरेदी मंदावल्याचे दिसले.

मोबाइलवरून संदेश : इंटरनेटचा फटका भेटवस्तूंना बसला आहे. तथापि, औरंगपुरा येथील कार्ड कलेक्शनच्या सुहास देशपांडे यांच्या दालनात गर्दी होती. महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी आकर्षक संदेश असलेल्या ग्रीटिंगची निवड करण्यात बराच वेळ घालवला.


चांदीची खरेदी
सोन्याची भेटवस्तू देणारे कमी झाले आहेत. मात्र, नवविवाहित आणि रेशीमगाठी जुळलेल्यांनी चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली. याचे प्रमाण अत्यल्प आहे. चांदीचे दागिने आजच्या फॅशनप्रमाणे असल्याने त्याची खरेदी करण्यात आली आहे. शिवाय चांदीसुद्धा चांगली गुंतवणूक आहे, हा यामागील उद्देश असल्याचे वामन हरी पेठेच्या व्यवस्थापक माधुरी घाटगे यांनी सांगितले.


प्रेमी युगुलांना धास्ती
भांगसीमाता गडाखाली नुकत्याच घडलेल्या हिडीस प्रकारानंतर प्रेमी युगुल धास्तावले आहेत. निवांतस्थळी जाऊन प्रेम व्यक्त करण्याला र्मयादा आल्या आहेत. दौलताबाद, म्हैसमाळ, शहरातील उद्यानांत प्रेमी दिसण्याचे प्रमाण कमी असणार आहे.