आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venutai Chavan School, Latest News In Divya Marathi

वेणूताई चव्हाण शाळेच्या रस्त्यावर धोकादायक पूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-वॉर्ड क्रमांक 26 गणेशनगरअंतर्गत येणाºया एन-8 वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या रस्त्यावरील पूल खचला आहे. पावसाचे आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी बनवलेल्या पुलाजवळ कचºयांचे ढिगारे साचलेले आहेत.
अर्धा रस्ता पुलात खचला असून वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुले, नागरिक ये-जा करतात. रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे पाच फुटांपर्यंत, खड्डा आहे. अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.