औरंगाबाद- मॅगी नूडल्स मध्ये घातक रासायनिक घटक आढळल्यानंतर शहरातील मॉल्स, दुकाने यातून मॅगी गायब झाली. त्या जागी आता येपी, स्मिथ अँड जॉन्स, टॉप रेमन, वाय वाय अशा कंपन्यांचे नूडल्स दिसू लागले आहेत. शहरातील ३५ पेक्षा अधिक गृहउद्योग आणि किमान १०० बचतगट नूडल्स, शेवया तयार करतात. मॅगीच्या तुलनेत हे नूडल्स अधिक आरोग्यदायी असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले.
नूडल्सच्या एकूण बाजारपेठेत ६० टक्के वाटा एकट्या मॅगीचा आहे, तर उर्वरित ४० टक्के उलाढाल इतर नूडल्स कंपन्यांची आहे. विविध राज्यात मॅगीच्या चाचणीत धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर आरोग्याचा प्रश्न प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. नूडल्स टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये टाकण्यात येणारे प्रिझर्व्हेटिव्हज नव्या आजारांना आमंत्रण देत आहेत. शहरातील मॅगी उत्पादनाचा अहवाल प्राप्त झालेला नसला तरीही जवळपास सर्व मॉल्स आणि दुकानांतून मॅगी काढून टाकण्यात आली आहे. मात्र, परदेशी कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्या, गृहउद्योग किंवा बचत गटांच्या माध्यमातून तयार होणारे नूडल्स अधिक प्रमाणात आरोग्यदायी आहेत. शिवाय यांच्या खरेदीतून देशातील पैसा देशातच राहणार आहे. मॅगीवरील कारवाईनंतर देशी नूडल्सना चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी चोखंदळपणे पसंती देणे गरजेचे असल्याचे मत एका मॉलच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
गहू पोषण मूल्ये मैदा
३४१ किलो कॅलरी एनर्जी(ऊर्जा) ३४८ किलो कॅलरी
१२.१ प्रोटीन(प्रथिने) ११
१.७ फॅट्स(मेद) ०.९
१. फायबर(तंतुमय पदार्थ) ०.३
६९. कार्बोहायड्रेट(कर्बोदके) ७३.९
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शहरात देशी नूडल्सना २० टक्के वाव...देशी नूडल्सच रसायनविरहित...