आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीच्या कॅन्टीनमध्ये सिलिंडरचा स्फोट, जीवितहानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद; जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील परिसरातील उपाहारगृहामध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन उपाहारगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून यात जीवितहानी झाली नसली, तरी लेणीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेरूळ येथे ३४ लेणी आहेत. यातील ३२ क्रमांकाच्या लेणीसमोर पुरातन विभागाच्या वतीने तळघरात उपाहारगृहात ही घटना घडली. यात उपाहारगृहातील साहित्य जळून खाक झाले, तर काही साहित्य दूरवर फेकल्या गेले. उपाहारगृहात कोणी नसल्यामुळे यात जीवितहानी झाली नाही. पुरातन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, आर. यु. वाकळे यांनी पत्रकारांना माहिती देता उडवाउडवीची उत्तरे दिली.