आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढेही वेरूळ महोत्सवाचे कायम आयोजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यापुढे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला वेरुळ महोत्सव होईल असा दावा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केला. सोनेरी महालात शनिवारी(१५ ऑक्टोबर) महोत्सवात अजय-अतुल यांची संगीत रजनी झाली . तत्पूर्वी झालेल्या कलावंतांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, सुभाष झांबड उपस्थित होते. रावल म्हणाले की, पर्यटनदृष्ट्या जगाच्या क्षितीजावर औरंगाबादचे महत्त्व आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील पर्यटकांना समृद्ध सांस्कृतिक परिचय देण्याची संधी मिळते.
त्यानंतर अजय-अतुल आणि सहकाऱ्यांनी हिंदी मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतला जाणारा वेरूळ महोत्सवात आतापर्यंत शास्त्रीय नृत्य, गायन, लोककला आदी भारतीय संगीत, नृत्य प्रकारांना स्थान दिले जात होते. यंदा ही परंपरा बाजूला ठेवून फिल्मी गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली. त्यामुळे शनिवारच्या मैफलीकडे शहरातील मान्यवर गायक, नर्तकांनी पाठ फिरवली होती. वीज खंडीत झाल्याने या मैफलीचा साऊंड ट्रॅक बंद पडला आणि गायकांनी काही गाणी रेकॉर्ड करून आणली होती तीच औरंगाबादच्या रसिकांना एेकवली असल्याचे उघड झाले.

अनासपुरेंनी उडवली धमाल
मराठवाडी बाज असलेल्या मकरंद अनासपुरेंनी खुमासदार किस्से अन‌् कविता सादर करत धमाल उडवली. औरंगाबादेतील खड्डे आणि सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्या, असे म्हणत त्यांनी खड्ड्यांविषयी शहरवासीयांचे दु:ख मांडले.

बातम्या आणखी आहेत...