आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला राजकारण्यांना ‘नो एंट्री’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला निवडणूक आयोगाने परवानगी दिली, मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा बाळगून असलेल्या पुढा-यांचा निवडणूक आयोगाने हिरमोड केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या महोत्सवाचे उद्घाटन अराजकीय व्यक्तीच्या हस्ते केले जावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.
जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या तयारीविषयी माहिती देण्याकरिता त्यांच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतानाच त्यांनी या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याचे सांगितले. या महोत्सवाचे उद्घाटन अराजकीय व्यक्तीच्या हस्ते करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.
या महोत्सवाला बाहेरचे पर्यटकही उपस्थित राहणार असल्याने शहराची चांगली प्रतिमा तयार व्हावी ,यासाठी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वॉर्ड अधिका-यांची बैठकही झाली. शहरातील मुख्य चौक व रस्त्यांच्या सुशोभीकरणाची तयारी सुरू आहे. चौकांतमध्ये विद्युत रोषणाई करण्यासाठी क ाही संस्था पुढाकार घेतील का याची चाचपणी करण्यात येणार आहे, असे सांगून संध्याकाळनंतरही कलाग्राम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
लोकल टू ग्लोबल : महोत्सव लोकल टू ग्लोबल या धाटणीचा असेल. त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जातील. हॉटेल आणि ट्रॅव्हल्स एजन्सींशी बोलणी सुरू असून पर्यटकांना सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.पर्यटन क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत कामे व्हावीत: पर्यटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम लालफितीत अडकले असले तरी भविष्यात प्राधिकरण स्थापन झाल्यावर यामार्फत येथील बेल्टमधील निसर्गरम्य, ऐतिहासिक, धार्मिक, वास्तूशिल्पीय पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांच्या कालावधीनंतर हा महोत्सव पुन्हा होत असल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले असल्याचे जाणवते. महोत्सव खंडीत झाला होता हे विसरायला लावणारे यावेळचे कार्यक्रम असतील अशी संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे.