आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिंबाच्या अनेक महाकाय झाडांची कत्तल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार आणि रविवार अशा सलग दोन सुट्यांची संधी साधून जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येलाच पिसादेवी भागात लिंबाच्या अनेक महाकाय झाडांची कत्तल करण्यात आली. अत्यंत निर्दयीपणे कटर चालवून ही झाडे भुईसपाट केल्याचे डीबी स्टार चमूच्या तपासात उघड झाले. मनपा आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंंचनामा करून लाकूडतोड्यांचा ठेकेदार आणि शेतमालकाचे जबाब नोंदवले. हद्द निश्चितीनंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जटवाडापाठोपाठ शहरालगतच्या पिसादेवी गावातही दोन दिवसांत अनेक महाकाय झाडे तोडण्यात आली. बांधावरची झाडे जमिनीची धूप थांबवतात. अशा झाडांमुळे जमीनही सुपीक राहते. झाडांची मुळे बांध धरून ठेवतात. त्यामुळे झाडांच्या पाल्यापासून मुळापर्यंत जमिनीत पाणी मुरवण्याची प्रक्रिया चालू राहते, पण हे सगळे विसरून अभय पारगावकर यांनी आपल्या शेतातील बांधावरची झाडे शनिवार रविवार साधून भुईसपाट केली.

अखेर पंचनामा
शनिवारपासूनही कत्तल सुरू होती. एका जागरूक शिक्षिकेने डीबी स्टारशी संपर्क साधून ही माहिती दिली; पण चमू तेथे पोहोचेपर्यंत अनेक झाडे तोडून त्याचा लाकूडफाटा ट्रकमध्ये नेण्यात आला होता. रविवारीही सकाळी पासूनच इलेक्ट्रिक कटर लावून ३० ते ३२ वर्षे वयाची महाकाय झाडे बुंध्यापासून भुईसपाट करण्याचे काम सुरू होते; पण चमू घटनास्थळी पोहोचल्याने अनेक झाडे वाचली. चमूने आधी मनपाला, पोलिसांना, त्यानंतर महसूल वन विभागाशी संपर्क साधला. काही वेळात मनपा आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले; पण तोपर्यंत दोन मोठी हिरवीगार लिंबाची झाडे तोडली गेली होती. इतर अनेक झाडांवर कटर चालवले जाणार होते, पण चमू पथक तेथे गेल्याने ती वाचली.
परवान्याची माहितीच नव्हती :आम्हाला वृक्षतोडीसाठीपरवाना घ्यावा लागतो असे माहिती नव्हते. तसे असेल तर आम्ही पुढील तोड थांबवतो, असे मनपाचे कृषी सहायक हरी घोडके यांच्याशी बोलताना शेतमालक अभय पारगावकर म्हणाले.

फौजदारी दाखल करणारच
पारगावकर यांनी झाडे तोडण्यासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नाही. त्यांचा तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणारच. विजयपाटील, उद्यानअधीक्षक, मनपा

आमचा सौदा झाला होता
शेतमालक अभय पारगावकर यांनी लाकूडफाट्यासहित आमच्याशी ५५ हजार रुपयांत झाडे तोडण्याचा सौदा केला होता. त्यापैकी आम्ही काही झाडे तोडली. आता आम्ही आणखी तोडणार नाहीत. युसूफपठाण, आडगावमाहोली, ठेकेदार

अभिप्राय मागवतो
महानगरपालिका आणि महसूल प्रशासनाकडूनही या प्रकरणात मी अभिप्राय मागवणार आहे. पंचनामा केला आहे. तीन दिवसांत संबंधितांकडून खुलासा मागवणार. रत्नाकर नागापूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी.
जटवाडापाठोपाठ पिसादेवी परिसरात अशी असंख्य महाकाय झाडे कटर लावून भुईसपाट करण्यात आली. त्याचा लाकूडफाटा ट्रॅक्टरमध्ये भरून नेला जात होता.
बातम्या आणखी आहेत...