आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच दिवसाआड पाणी; गळत्या बंद आणि नियोजन करून शहरात येणारे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने जानेवारीला १२ तासांच्या शटडाऊनची घोषणा करून नागरिकांना पाणीटंचाईची जाणीव करून दिली असली तरी या काळात केल्या जाणाऱ्या दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा १५ एमएलडी पाणी वाढणार असून जानेवारी अखेर अथवा फेब्रुवारीपासून शहराला एक दिवसाअाड पाणीपुरवठा केला जाणार आहे. मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.
आज सर्वसाधारण सभेत समांतरबाबत बोलताना आयुक्त केंद्रेकर म्हणाले की, समांतर हा मोठा विषय आहे. आपले प्राधान्य जायकवाडीतून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्याला आहे. कंपनीलाही तसेच सांगण्यात आले आहे. या मार्गावरील शहरातील कामांसाठी कंपनीने तारखेला १२ तासांचा शटडाऊन घेण्याचे जाहीर केले आहे. या काळातील दुरुस्तीच्या कामांनंतर शहराला येणाऱ्या पाण्यात १५ एमएलडीची वाढ होणार आहे असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने सांगितले आहे की शटडाऊनच्या कामांनंतर २० दिवसांनी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

दिवसाआड पुरवठा
सध्याशहरात तीन दिवसांअाड पाणीपुरवठा होत आहे. कंपनीच्या मते तारखेच्या शटडाऊनच्या काळातील दुरुस्तीनंतर शहरात येणाऱ्या पाण्यात १५ एमएलडीने वाढ होणार आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी तेथून पुढे जागोजाग होणारी गळती हे पाण्याच्या तुटवड्याचे मोठे कारण आहे. १५६ एमएलडी पाणी जायकवाडीतून उपसले जात असले तरी प्रत्यक्षात शहरात येईपर्यंत त्यात मोठी घटच होते. किमान ३६ एमएलडी पाणी या ना त्या कारणाने वाया जाते हे समोर आले आहे. गळत्या बंद करून जर १५ एमएलडी पाणी वाचवले तर ते शहरात वापरता येईल. थोडक्यात वाया जाणारे पाणी वाचवूनच शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उन्हाळ्यात काय होणार : सध्या जायकवाडीत नावापुरता पाणीसाठा उरला असताना येणारा उन्हाळा पाणी संकटाचा असेल असे बोलले जात असताना एक दिवसाआड पाणीपुरवठा शक्य आहे का असे विचारले असता तज्ज्ञांनी पाण्याचे नियोजन गळत्या बंद करणे एवढे जरी केले तरी बऱ्यापैकी पाणी संकट रोखता येईल. त्यासाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवावा लागणार आहे.

काय होणार परिणाम?
१२ तासांच्या शटडाऊनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. टाक्याच भरणार नसल्याने १० तारखेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. पुढील तीन दिवस तरी पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. पाण्याच्या वेळा, दाब अपुरा राहणे असे प्रकार होणार आहेत. तसेच या काळात टँकरने पुरवठाही बंद राहणार आहे.

काय असेल शटडाऊन?
जानेवारी २०१६ रोजी शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर १२ तासांसाठी शटडाऊन अर्थात खंडनकाळ घेण्यात येणार आहे. सकाळी ते रात्री वाजेपर्यंत हा खंडनकाळ असणार आहे. ( जुनी आणि नवी योजना ) १२०० आणि ७०० मिमी या दोन्ही जलवाहिन्या बंद राहतील. परिणामी पाण्याचे वेळापत्रक एका दिवसाने पुढे ढकलले जाणार आहे.

कोणती कामे होणार?
>या शटडाऊनच्या काळात मुख्य लाइनवरील विविध कामे आणि देखभाल दुरुस्ती केली जाईल. तसेच शहरात जलकुंभ स्वच्छता, विविध व्हाॅल्व्ह बदलणे, ग्रीसिंग, डमी रिपेअरिंगसारखी कामे करण्यात येणार आहेत.
>नव्या जुन्या पाइपलाइनवरील कामे
>फारोळानाला येथे १२०० मिमी लाइनवर असलेल्या स्कोर व्हाॅल्व्हचा टेलपीस बदलणे
>जायकवाडीयेथे जुन्या नवीन पंप हाऊसला जोडणाऱ्या ३०० मिमी व्यासाच्या वाहिनीचे वेल्डिंग
>फारोळापंप हाऊस येथे व्हॉल्व्ह बदलणे
>वाल्मीजवळगळती बंद करणे
>नक्षत्रवाडीक्रॉस कनेक्शन जोडणी
>जुन्या नव्या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर लावणे.
बातम्या आणखी आहेत...