आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद-पुणे मार्गावर दोन व्होल्व्हो बसेस सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाने व्होल्व्हो बस (शिवनेरी) कमी झाल्या होत्या. त्यामुळे सकाळी आठ आणि सायंकाळी पाच या वेळेत बस नसल्यामुळे प्रवाशांची अडचण होत होती. मात्र, शनिवारपासून नवीन दोन व्होल्व्हो बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
सायंकाळी पाच वाजता एका बसचे उद‌्घाटन करण्यात आले. त्यानंतर या बसने पुण्याकडे प्रस्थान केले. एसटी महामंडळाने नवीन व्होल्व्हो बससेवा सुरू केल्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बससंख्या वाढवून सहा करण्यात आली होती. मात्र, दोन बसचा करार संपल्याने त्या दोन महिन्यांपूर्वी कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी व सायंकाळी दोन बसेस कमी पडल्या होत्या. परिणामी सहा फेऱ्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची संख्याही कमी होत होती. वेळेवर बस नसल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे शनिवारी दोन नवीन बस सुरू करण्यात आल्या. यापैकी एक बस सायंकाळी पाच वाजता पुण्याकडे निघाली. दुसरी गाडी रविवारी सकाळी आठ वाजता पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. या दोन बसेसमुळे पुण्याकडे जाण्यासाठी एकूण १८ फेऱ्या होणार असून बसची संख्या सहा झाली आहे. त्यामुळे आणखी २४० प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या वेळी आगार व्यवस्थापक प्रताप जाधव, एल. व्ही. लोखंडे, ट्रेनी आगार व्यवस्थापक अजय मोटे, व्ही. एस. मारोळकर, रियाज खान आदींची उपस्थिती होती.