आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VHP Leader Praveen Togadia Slams Narendra Modi For 'toilets First, Temples Later' Comment

मोदींनी देवालयांची प्रतिष्ठा घालवली; तोगडिया यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदींनी शौचालयांची देवालयांसोबत तुलना करून देवालयांची प्रतिष्ठा घालवल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काही काळापूर्वी जयराम रमेश या काँग्रेसच्या मंत्र्यांनी असेच विधान करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. आतादेखील तोच विषय आला आहे. मोदींचे नाव न घेता ते म्हणाले, मुळात शौचालय आणि देवालय अशी तुलनाच करायला नको होती. देवालये तमाम भारतीयांसाठी पवित्र आहेत. त्यांची अशी तुलना केल्याने देश दु:खी आणि संतप्त झाला आहे.

भारतात शेतीविकासासाठी पशुधन वाढावे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी यांत्रिक कत्तलखाने सुरू केले. त्यामुळे गायींची कत्तल होते. गाय हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून शेतकर्‍याला गाय विकायला भाग पडता कामा नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या वेळी प्रा. व्यंकटेश आबदेव, दयाराम बसैये, राजीव जहागीरदार यांची उपस्थिती होती.