आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Dr. Babasaheb Ambedkar Marathwada

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूसाठी ‘टॉप फाइव्ह’ नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेत गुरुवारी 27 जणांच्या मुलाखती झाल्यावर ‘टॉप फाइव्ह’ नावे राजभवनात गेली आहेत. मुलाखतीनंतर कुलगुरूंचे नाव राज्यपाल जाहीर करतील.
या पदासाठी 70 अर्ज होते. छाननीनंतर 27 नावांची यादी निश्चित झाली. मुंबईत त्यासाठी मुलाखती झाल्या. निवड समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सी. के. ठक्कर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार तसेच समन्वय अधिकारी म्हणून हिमाचल प्रदेशचे परमजितसिंग अहुजा यांचा सहभाग होता. आता मुख्य सचिवांसोबत शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नवे कुलगुरू रुजू होतील, असे संकेत असून ‘टॉप फाइव्ह’ नावे मात्र कळू शकलेली नाहीत.

डॉ. नामदेव कल्याणकर आघाडीवर
नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते नांदेड येथील स्वाराती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. ते फिजिक्स विषयातील तज्ज्ञ आहेत.