आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी संशोधन करण्याची गरज : डॉ. चोपडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - भावी पिढी घडवण्याची जबाबदारी युवकांवर आहे; परंतु युवकांना घडवणारे शिक्षक असल्यामुळे शिक्षकांनी संशोधन केले, तरच चांगली पिढी घडू शकते, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमसीए विभागाच्या वतीने शुक्रवारी इनोव्हेशन इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या वेळी परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बीसीयूडीचे संचालक प्रा. डॉ. के. व्ही. काळे, एमआयटी समूहाचे महासंचालक मुनीश शर्मा, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश गोडिहाळ उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. चोपडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची परिषद फायदेशीर राहील, त्यांच्यात व्यावसायिक, उद्योजकता वाढीस लागायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी परीक्षा वर्गासोबतच संशोधनाविषयी गोडी वाढवावी आणि अॅप्लिकेशनचा आपल्या दैंनदिन जीवनात योग्य रीतीने वापर करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. बीसीयूडीचे संचालक डॉ. काळे म्हणाले, मानव जातीच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो, यावर भर दिला. या वेळी कार्यक्रमात डॉ. एम. एच. कोंडेकर, प्रा. प्रशांत चिंतल, डॉ. माधुरी जोशी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. अमोल चित्ते यांनी केले, तर आभार डॉ. माधुरी जोशी यांनी मानले.