आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे उपायुक्त सुर्यकांत हजारेंच्या कारला अपघात, हजारे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात अौरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त सूर्यकांत हजारे जखमी झाले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यातील डोणगाव पाटीजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
 
सूर्यकांत हजारे त्यांच्या स्कोडा कारने (एम.एच.२३ ए.ओ.१६६४)  बीड जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडून औरंगाबादकडे निघाले होते. या अपघातात हजारे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, हात आणि डोक्याला मार लागला आहे.  अंबड तालुक्यातील डोणगावजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला (टी.एन.२८ ए.ए.५६७६) त्यांच्या कारची धडक बसली. यात कारचा समाेरील भाग चुरा झाला  आणि हजारे कारमध्येच अडकले. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना कारमधून बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील कमलनयन  बजाज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...