आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठितांचा पुढाकार; 'त्यांची' जोडी जमली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पीडित तरुणीशी लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाची प्रतिष्ठित नागरिकांनी समजूत घातल्यावर त्याच्या नकाराचे होकारात रूपांतर झाले आणि दोन्ही कुटुंबांवरील दडपण नाहीसे झाले. पीडित तरुणीने बोर्डे कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री बुद्ध लेणी परिसरात छोटेखानी लग्न सोहळा पार पडला.
पीडित तरुणीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी योगेश बोर्डे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तसेच लग्न करण्यासाठी फ्लॅट आणि पाच लाखांची मागणी केल्याची तक्रार दिली. यात योगेश बोर्डे आणि अरुण बोर्डेंसह एकूण आठ जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहकार्य नाही
फिर्यादी अाणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले नाही. तक्रार मागे घेण्यासंदर्भात कुठलाही अर्जही आलेला नाही, असे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. मिलिंद दाभाडे, गौतम खरात, दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, रूपचंद वाघमारे, किशोर थोरात, भंते नागसेन बोधी यांनी दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी योगेशची समजूत घातली. त्यानंतर तो लग्नासाठी तयार झाला आणि औरंगाबाद लेणीत सायंकाळी विवाह सोहळाही पार पडला.
काय म्हणते पीडिता
आणि मुख्य आरोपी

माझापुतण्याची किडनी बदलायची आहे. त्यामुळे आमचा परिवार तणावाखाली आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर लग्न करू, असे मी तिला म्हणालो होतो, असे योगेशने सांगितले, तर मुलांच्या घरच्यांनी माझ्या काकांकडे लग्नासाठी पैसे आणि फ्लॅटची मागणी केली होती. त्यामुळे राग आल्याने मी तक्रार दिली होती, असे पीडित मुलीने सांगितले.