आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर रस्‍त्‍यात स्‍वत:वर उधळुन घेतल्‍या नोटा, औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा प्रताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  भर रस्‍त्‍यात स्‍वत:चा वाढदिवस साजरा केला. स्‍टेजवर 'मैं हूँ डॉन' या गाण्‍यावर डान्‍स केला आणि यावेळी स्‍वत:वर नोटाही उधळुन घेतल्‍या. औरंगाबादमध्‍ये काँग्रेस नगरसेवकाचा हा प्रताप समोर आला आहे. लोकप्रतिनिधीने संपत्‍तीचे असे ओंगळवाणे प्रदर्शन केल्‍याने त्‍यांच्‍यावर आता टीका होत आहे.

 

धक्‍कादायक म्‍हणजे या कार्यक्रमात काही पोलिस अधिकारी, काँग्रेसचे नेते आणि औरंगाबाद महापालिकेचे अधिकारीही सहभागी झाल्‍याची माहिती आहे. शहरातील बेगमपुरा भागाचे काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांचा 30 नोव्‍हेंबररोजी रात्री वाढदिवस साजरा करण्‍यात आला. तेव्‍हाचा व्हिडिओ आता व्‍हायरल झाला आहे. मागील 22 वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. 

 

...तर राजिनामा देईल- काँग्रेस नगरसेवक अफसर खान 
अफसर खान यांनी मात्र या आरोपांचा इन्‍कार केला आहे. ते म्‍हणाले, 'माझा वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षी कायकर्ते साजरे करत असतात. यावर्षीही तो साजरा करण्‍यात आला. मी स्टेजवर जाऊन डान्‍स केला होता. मात्र 3-4 मिनिटांच्‍या वर मी तेथे थांबलो नाही. कार्यक्रमात मी स्‍वत:वर नोटा उधळवल्‍या हा आरोप चुकीचा आहे. मी नाचत असताना कार्यकर्त्‍यांनी नोटा उधळल्‍या. माझ्या हे लक्षात येताच मी त्‍यांना थांबवले. मला हे आवडले नाही. तसेच ज्‍या नोटा उधळल्‍या त्‍या 20 रुपयांच्‍या होत्‍या. एकूण 2000 रुपयांची रक्‍कम त्‍यांरी अशाप्रकारे उधळली. तरीही हे लक्षात येताच मी स्‍टेजखाली आलो. मी तेथे जर 3-4 मिनिटांच्‍यावर थांबलो होतो, असे सिद्ध झाले तर राजिनामा देईल.'  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...