आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराची संधी : एमआयटी तंत्रनिकेतनच्या 82 विद्यार्थ्यांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या व्हिडिओकॉन उद्योग समूहाने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये रोटेगाव येथील एमआयटी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील ८२ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेचे १८, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचे २४ आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षी विविध कंपन्यांनी ७० विद्यार्थ्यांची निवड केली होती. 
 
लेखी परीक्षा, अॅप्टिट्यूट टेस्ट आणि थेट मुलाखतीतून ही निवड करण्यात आली. ही प्रक्रिया व्हिडिओकॉनचे एच. आर. मॅनेजर दत्ता जोशी, मुकुंद मनाल आणि सहायक विजय तांदळे विलास खुर्डे यांच्या देखरेखीखाली झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच नियुक्तिपत्र देण्यात आले. प्राचार्य प्रा. एम. आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. यू. एच. चव्हाण यांनी इंटरव्ह्यूच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयाने दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवले. निवड झालेल्यांचे स्वागत प्राचार्य वैद्य यांनी केले. संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. वाय. ए. कवडे, महासंचालक प्रा. मुनीश शर्मा, संचालक प्रा. डॉ. शकुंतला लोमटे, प्रा. बिजली देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. 
 
निवड प्रक्रियेसाठी यांचा पुढाकार 
निवडप्रक्रियेसाठी प्रा. ए. एस. नागरिक, प्रा. व्ही. जी. तळेकर, प्रा. एस. एन. पाठक, प्रा. व्ही. एम. जाधव प्रा. वाय. के. धोत्रे तसेच विभाग स्तरावर प्रा. व्ही. ए. धोपटे, प्रा. आर. आर. मोरे, प्रा. जी. ए. भिसे, प्रा. पी. व्ही. गोर्डे, प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा. अमोल निकम, प्रा. के. के. पाटील यांनी पुढाकार घेतला. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...