आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidhan Parishad Seat In Aurangabad Jalna Election Congress Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत सेनेचा गड ढासळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सुभाष झांबड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजपचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांचा ७२ मतांनी पराभव केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडाकडे स्पष्ट बहुमत होते, त्यामुळे झांबड यांच्या विजयावर आज शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी होते. काँग्रेसचे १४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ८१ असे एकूण २२५ मते आघाडीच्या बाजून होते. तर, सेना भाजप युतीकडे १४५ मते होती. दोनच उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार असा कयास होता. मात्र, युतीचे उमेदवार तनवाणी यांना १८८ मते मिळाल्यामुळे आघाडीचे किती मतदार फुटले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आघाडीच्या मतदारांचे सेना-भाजप युतीवर प्रेम