आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे पुण्यस्मरण, यात्रेचे औचित्य साधून १३ अनाथ मुलींना घेतले दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हरसिद्धी देवी संस्थान आणि या प्रभागाचे नगरसेवक, मनपाचे आरोग्य सभापती विजय औताडे यांनी यंदा यात्रेनिमित्त अनाथ आश्रमातील १३ मुलींना दत्तक घेतले असून त्यांचा शिक्षणापासून सर्वच खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन ही समयसूचकता दाखवण्यात आली आहे.
गुरुवारपासून हर्सूल येथील ग्रामदैवत असलेल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला प्रारंभ झाला. यात पहिल्याच दिवशी कुस्त्यांची मोठी दंगल झाली. याचा खर्च दहा लाख रुपयांपर्यंत गेला. तसेच रात्री प्रसिद्ध बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यासह इतर कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला, पण औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपून बीड बायपास येथील भगवानबाबा बालिका अनाथाश्रमातील १३ मुलींना एक वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांचा पूर्ण खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे. या मुलींना ब्लँकेटसह कपडे, शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

समाधान मिळाले
^गावाची यात्रा आणि आईचे पुण्यस्मरण याची सांगड घालून या मुलींना दत्तक घेतले. त्यांना शिक्षण देण्यासाठी तसेच त्यांचा काही कालावधीसाठी सहारा होण्याचे भाग्य मिळाल्याने वेगळ्या प्रकारचे समाधान मिळत आहे. -विजय औताडे, मनपा आरोग्य समिती सभापती

या मुलींना घेतले दत्तक
ज्यामुलींना आई आणि वडील नाहीत, त्यांना दत्तक घेण्यात आले आहे. यामध्ये आयेशा, गौरी, शालिनी चौधरी, नंदिनी चौधरी, सुनंदा वडाळे, किरण जाधव, अंकिता भोसले, निकिता भोसले, साक्षी बोराडे, पूजा उघळे, शेख आयेशा आणि अश्विनी सावंत यांचा समावेश आहे.